

हिंगोली ः हिंगोली नगपालिकेकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने शहरातील रस्त्यावरील पथदिव्याचा तसेच सिध्देश्वर व डिग्रस कऱ्हाळे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या विजेच्या पुरवठा खंडित करण्यात आला. शहरवासीयांना दोन दिवसांपासुन पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
मार्च एण्डच्या उदिष्टपूर्तीसाठी महावितरणकडून वसुली मोहीम राबविली जात आहे. हिंगोली नगर पालिकेला महावितरण कंपनीने दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्याची कोटयावधी थकबाकी आहे. हिंगोली शहरास सिध्देश्वर धरणातुन पाणी पुरवठा केला जातो तर डिग्रस कऱ्हाळे येथे या पाण्याचे जलशुद्धीकरण केले जाते. त्यासाठी दोन्ही ठिकाणी पंपींग स्टेशनवर महावितरणने विज पुरवठा केलेला आहे. सिध्देश्वर येथील विजेचे महावितरणने यापूर्वी २३ कोटी ८९ लाख रूपये व चालू आर्थिक वर्षाचे दोन कोटी दोन लाख ५६ हजार रुपये थकीत आहेत. त्याप्रमाणे डिग्रस येथील जलशुद्धीकरणाचे पूर्वीचे १० कोटी ५६ लाख रुपये थकीत आहेत चालू आर्थिक वर्षाचे ६२ कोटी ५६ लाख थकीत आहेत.
त्यामुळे चालू आर्थिक वर्षात एक कोटी ६४ लाख ५६ हजार रुपयाची थकबाकी नगरपालिकेने भरावी अशा सुचना महावितरणने दिल्या होत्या. परंतु १६ मार्च रोजी केवळ २२ लाख रुपयाचा धनादेश महावितरणला दिला होता. परंतु ही रक्कम घेण्यास नकार देऊन चालू आर्थिक वर्षाची रक्कम देण्यास महावितरणने सांगितले होते. त्याप्रमाणे शहरातील रस्त्यावरील पथदिव्यांकरीता देण्यात येणाऱ्या विजेची थकबाकी ज्यात नगर पालिकेकडे सात कोटी रुपयांची थकबाकी असून चालू आर्थिक वर्षात ४० लाख रुपये थकित आहेत.
येथे क्लिक करा - वसमत तहसीलचा लिपीक निलंबित; ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करणे भोवले
किमान चालू आर्थिक वर्षाचे ४० लाख रुपये भरला करावा असे महावितरणचे म्हणने आहे. मात्र ऐवढ्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यास नगर पालिकेने असमर्थता दर्शविल्याने १६ मार्च रोजी शहरातील विज पुरवठ्याचा तसेच सिध्देश्वर व डिग्रस येथून पाणी पुरवठा करणाऱ्या विजेचा पुरवठा बंद करण्यात आला. परिणामी दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास शहरवासीयांना पथदिव्याअभावी अंधारातच राहावे लागले. तसेच पाणी पुरवठ्याची विज पुरवठा खंडित केल्याने शहरवासीयांना पाण्याचाही सामना करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.